संक्षिप्त

संक्षिप्त
Published on

संक्षिप्त
उष्णतेमुळे जूनमध्ये लागवडीचे नियोजन
जळगाव ः खानदेशात कापूस, केळी, मिरची आगाप लागवड केली जात होती. परंतु उष्णता आता अधिक आहे. त्यात पुढे आणखी वाढीचे संकेतही आहेत. यामुळे शेतकरी सध्या शेत लागवडीसाठी तयार करून घेत आहेत. अनेकांनी गादीवाफ्यांवर मिरची व अन्य पिकांसाठी पॉली मल्चींगदेखील टाकून घेतले आहे. १ जून किंवा ५ जूनपर्यंत त्यात लागवड केली जाईल. कापसाची लागवडदेखील अनेक जण १ जूननंतर करतील, असे दिसत आहे. केळी लागवडदेखील सध्या रखडत सुरू आहे. कारण ऊन तापत आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत कडक ऊन असते. यामुळे पीकवाढीवर परिणाम दिसत आहे.
---
कापूस दर स्थिर
जळगाव ः कापूस दर या आठवड्यातही स्थिर आहेत. मध्यंतरी दरवाढीची आवई होती. परंतु दर कारखान्याच्या खरेदीत किंवा बाजारात कापूस नेऊन तेथे ८८०० ते ९२०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर मिळत आहेत. कमाल दरात वाढ दिसत नसल्याची स्थिती असून, दर मात्र स्थिर आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री डिसेंबर - जानेवारीत केली आहे. या दरवाढीबाबत त्यांना लाभ नाही. काही शेतकऱ्यांकडे कापूस आहे. पण कापूस विक्रीसाठी खासगी जिनींग कारखान्यांकडे विक्रीसाठी नेत आहेत. तेथे दर्जाचे निकष, विक्रीसंबंधीच्या अटी असून, त्यानुसार दर दिले जात आहेत. खेडा खरेदी फारशी सुरू नाही. मकर संक्रांतीनंतर कापूसदरवाढ अपेक्षित होती. परंतु दरात वाढ झाली नाही. यामुळे अनेकांनी कापूस विक्रीला सुरवात केली. त्यात दरवाढ अलीकडेच झाली आहे.
--
मजुरी दर स्थिर
धुळे : खानदेशात केळी व इतर पिकातील तणनियंत्रण, कापूस लागवड, भाजीपाला पिकांमधील काढणी व इतर कामे आदींसाठी मजुरीचे दर यंदा स्थिर आहेत. मध्यंतरी जळगाव, धुळ्यातील काही गावांत मजुरी दरवाढीसाठी काही मजुरांनी रेटा लावला होता. परंतु शेतकरी गेले काही वर्षे कमी व अतिपावसाने संकटात आला. यंदा सुरवातीला कापसाचे कमी दर व खरिपातील ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. केळी दरही मध्यंतरी कमी होते. परिणामी मजुरी दर स्थिर आहेत. नुकसान झाले, पण पीकविमा व इतर भरपाई कुठेही मिळाली नाही. दुसरीकडे उत्पादन खर्च वाढत आहे. मजुरी दर कसे वाढविणार, कारण शेतमालाचे दर गेले दोन वर्षे झपाट्याने घटले आहेत, अशा समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com