

Khadakwasala Dam Water
पुणे - जून महिना संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही मॉन्सूनने अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा तळाला पोहोचला असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह जिल्ह्यातील बहुतांश धरणांतील साठ्याची स्थिती चिंताजनक आहे. उपयुक्त साठा संपलेल्या धरणांची संख्या आता चारवर पोहोचली आहे.