Junnar Heritage : जुन्नरच्या शिवकालीन बारव व मलिक अंबर नहर संवर्धनाची मागणी; आमदार सोनवणे यांचे सांस्कृतिक मंत्र्यांकडे साकडे

मोगलकालीन मलिक अंबर यांच्या जुन्नर शहरातील ऐतिहासिक बारव व पाणीपुरवठा योजनेचे संवर्धन राज्याच्या बारव संवर्धन योजनेत समाविष्ट करण्याची आमदार शरद सोनवणे यांची सांस्कृतिक मंत्र्याकडे मागणी
Reviving History: The Ancient Water System of Malik Ambar in Junnar

Reviving History: The Ancient Water System of Malik Ambar in Junnar

sakal

Updated on

जुन्नर : प्राचिन जुन्नर शहराची पाणीपुरवठा योजना मोगल काळातील नगररचनाकार, वास्तुविशारद मलिक अंबर यांनी तयार केली आहे. मात्र काळाच्या ओघात आणि वाढत्या शहरिकरणामुळे ही पाणी योजना लुप्त होत आहे. या पाणी योजनेवरील तलाव, बारव शेवटच्या घटका मोजत आहेत. यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारच्या बारव संवर्धन योजनेत याचा समावेश करण्यात यावा. अशी मागणी आमदार शरद सोनवणे यांनी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. तर सह्याद्री गिरीभ्रमण संस्था देखील या मागणीसाठी आग्रही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com