Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

जुन्नरमध्ये वकील असल्याचे सांगत एका व्यक्तीने डॉक्टरकडून बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याच्या नावाखाली ३५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
Extortion Case Filed Against Fake Lawyer in Junnar

Extortion Case Filed Against Fake Lawyer in Junnar

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर शहरातील प्रथितयश डॉक्टरकडे वकील असल्याची बतावणी करत तुमचे बेकायदेशीर बांधकाम नियमित करून देतो असे सांगत पस्तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज संजयकुमार नानावटी रा. सोमवार पेठ, पांडे चौक, बार्शी ता. बार्शी जि. सोलापुर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद लुकेश भिमसिंग खोत यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com