

Successful Joint Operation by Junnar and Pune Police
sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील निमगिरी येथे सख्या भावाच्या पत्नीचा निघृणपणे खून करून फरार झालेला आरोपी तुषार निंबा साबळे याला अवघ्या चोवीस तासामध्ये पुण्यातून जेरबंद करण्यात जुन्नर पोलिसांना पुणे येथील वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या मदतीने यश आले आहे. आरोपी तुषार निंबा साबळे यास जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.