Junnar Narayangaon News: आईपासून दुरावलेल्या तरसाच्या दोन पिल्लांना शेतकरी, वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने जीवदान; माणिकडोह निवारा केंद्रात दाखल

आईपासून दुरावलेल्या अशक्त तरस पिल्लांना शेतकरी, आपदा मित्र व वनविभागाच्या तत्परतेने उपचारासाठी माणिकडोह निवारा केंद्रात दाखल करून जीवदान
जुन्नर : तरसांच्या पिला समावेत माणिक डोह येथील निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी व वन कर्मचारी

जुन्नर : तरसांच्या पिला समावेत माणिक डोह येथील निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी व वन कर्मचारी

Sakal

Updated on

नारायणगाव : आईपासून दुरावलेल्या व अन्न,पाण्यावाचून गलित गात्र झालेल्या तीन महिन्याच्या तरसांच्या दोन पिल्लांना नारायणवाडी येथील शेतकरी, आपदा मित्र सुशांत भुजबळ व वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्यामुळे जीवदान मिळाले. या पिल्लांना आज दुपारी माणिक डोह येथील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com