जुन्नर : जुन्नर शहरालगतच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे. .जुन्नर शहर व आदिवासी भागातील जवळपास चाळीस हून अधिक गावांना पेट्रोल व डिझेल या इंधनाचा पुरवठा करण्यासाठी शहरालगत विविध कंपन्यांचे जवळपास आठ पेट्रोल पंप आहेत. रविवार ता. 21 रोजी पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पेट्रोल पंप बंद असल्याने मनस्ताप सहन करावा लागला तर एका पेट्रोल पंपावर इंधन साठा मर्यादित स्वरूपात असल्याने केवळ प्रति वाहन एकच लिटर पेट्रोल मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या पेट्रोल पंपावर रविवारी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले..रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तसेच आदिवासी भागात सध्या यात्रा उत्सवाच्या हंगाम सुरू झाल्याने मुंबई, पुणे व अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक आले, मात्र पेट्रोल पंपावर पेट्रोलच मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली गेली तर तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचे देखील पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने हाल झाल्याचे पाहावयास मिळाले..तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असल्याने बेजवाट येथील पंप तीन दिवसांपासून तर लेण्याद्री मार्गावरील पंप शनिवार ता. 20 पासून बंद असल्याचे पंप चालक डॉ. लुकेश खोत यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.