
नारायणगाव - जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या जम्बो, शरद सीडलेस या निर्यातक्षम द्राक्षांचा तोडणी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. द्राक्षाची बांगलादेशात निर्यात सुरू झाली आहे. बांगलादेशातील व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी बांधावर येऊन सुरू केली असून, प्रतवारीनुसार द्राक्षाला प्रतिकिलो ११० ते १२५ रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.
चवीला गोड, जांभळाच्या आकाराची, खाण्यास कुरकुरीत आणि आरोग्यवर्धक असलेल्या जम्बो द्राक्षाला बांगलादेशातील खवय्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. मात्र, आयातशुल्क वाढीचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसत आहे.