

शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर ): कांदा पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना महसूल, कृषी विभागाचे पथक.
Sakal
नारायणगाव: गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जुन्नर तालुक्यातील 35 गावांना बसला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार आज पासून फळ -भाजीपाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पंचनामा करण्यासाठी महसूल, कृषी, पंचायत समिती यांचे संयुक्त पथक करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात पंचनामे पूर्ण होतील. अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिले.