Junnar News : जुन्नरमध्ये महिलांच्या टोळीचा 'हांडे'फेरीवर डल्ला! गोडाऊन फोडून लंपास केले ९० तांब्याचे हांडे; एलसीबीने महिलांच्या मुसक्या आवळल्या

जुन्नर शहरातील भांड्यांचे गोडाऊन फोडून तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत.
Theft in Broad Daylight: Storehouse Broken into at Mahajan Ali, Junnar

जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी भांड्याच्या गोडाऊन मध्ये चोरी केलेल्या महिला टोळीतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले साहित्य. समवेत पोलिस अधिकारी व कर्मचारी.

sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी गोडाऊन फोडून चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या महिलांच्या टोळक्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याने या कारवाईबाबत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान जुन्नर शहरात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच थेट महिलांचेच टोळके या चोरीच्या घटनेत सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com