

Action taken for inappropriate behavior with minor girl luring money; Otur police take prompt action
sakal
ओतूर : जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील एका गावात अकरा वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी किराणा दुकानदाराविरुद्ध ओतूर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.