Junnar Police Take Action Against Illegal Cattle Transportation
sakal
जुन्नर - जुन्नर ते नारायणगाव मार्गावर अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्याविरोधात जुन्नर पोलिस ठाण्याकडून कारवाई करण्यात आली. बुधवार (ता. 24) रोजी जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बादशाह तलाव परिसरात रात्री साडे अकराच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली असून साहिल जाकीर पठाण (वय-24 वर्ष) रा. बादशहा तलाव, ता. जुन्नर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.