esakal | पोलीस असल्याचे भासवून सोन्याचे दागिने केले लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पोलीस असल्याचे भासवून सोन्याचे दागिने केले लंपास

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर येथील ज्ञानेश्वर नारायण डोके वय ५६ हे ऐरोली-मुंबई (Mumbai)येथे जाण्यासाठी एस.टी. बसस्थानकात (ST Bus)जात असताना त्यांना अनोळखी इसमाने मी पोलीस आहे तुम्ही इकडे या असे म्हणून तुम्ही कोठे चालला आहात ? तुमच्या पिशवीत व खिशात काय आहे, ते दाखवा असं म्हणत लूट केली. पोलीस असल्याचे भासवून भाजीपाला व्यावसायिकाच्या (Vegetable traders)अगांवरील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हातचलखीने लंपास केल्याची घटना जुन्नर येथे रविवारी ता.३१ रोजी घडली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

जुन्नर येथील ज्ञानेश्वर नारायण डोके वय ५६ हे ऐरोली-मुंबई येथे जाण्यासाठी एस.टी. बसस्थानकात जात असताना त्यांना अनोळखी इसमाने मी पोलीस आहे तुम्ही इकडे या असे म्हणून तुम्ही कोठे चालला आहात ? अशी विचारणा केली. यावेळी तुमच्या पिशवीत व खिशात काय आहे ते दाखवा असे म्हणून पुढे मोठे साहेब आहेत एव्हढे सोने अंगावर घालून जाऊ नका ते काढून घ्या असे सांगितले.

हेही वाचा: कोहली-स्मिथ-विलीयमसन : मैदानात प्रखर शत्रू तर बाहेर निखळ मित्र!

डोके यांच्या रुमालात त्याने खिशातील वस्तू तसेच एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी व तीन तोळे वजनाचे ब्रेसलेट बांधून रुमाल त्यांना दिला. एस.टी. बस मधून ऐरोली येथे जात असताना रस्त्यात त्यांनी रुमालाची गाठ सोडून पाहिली असता त्यातील अंगठी व ब्रेसलेट आढळून आले नाही. यामुळे त्यांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध एक लाख ७८ हजार ८५० रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

loading image
go to top