

The incident damaged farmlands, cattle sheds and rural roads, while officials have begun damage assessment and survey work.
Sakal
जुन्नर : जुन्नर शहरासह तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील भात खाचरे तुडुंब पाण्याने भरली तर ओढे पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने नदीपात्रातील पाणी पातळी मध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. किरकोळ अपवाद वगळता आदिवासी भागात कोणत्याही स्वरूपाची मोठी हानी घडली नाही.