Junnar News : सावरगाव कुसूर गटातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाकार

Junnar road pothole repair : जुन्नर तालुक्यात सावरगाव कुसूर–निमदरी मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक झाली होती. स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागकडे पाठपुरावा करून तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.
Junnar road pothole repair

Junnar road pothole repair

sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील सावरगाव कुसूर गटातील खोरे वस्ती ते निमदरी या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्यावरून वाहतूक करताना खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अक्षरशः कंबरडे मोडले जात होते. या भागातील नागरिकांनी या गटाचे नवनिर्वाचित सदस्य गुलाब पारखे यांच्याकडे या समस्येचे गाऱ्हाणे मांडताच पारखे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला व लागलीच या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम या विभागाकडून सुरू करण्यात आले. यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर सत्काराचे हारतुरे घेण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य हे आपल्या गटात कामाला लागल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com