

Junnar: Mayor Sujata Kajale and dignitaries presenting prizes to the winners of the state-level elocution competition organized by Junnar Nagar Vachanalaya and Swarajya Mitra Mandal.
Sakal
जुन्नर : जुन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेत खुल्या गटात सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा मिथुन दत्तात्रय माने याने प्रथम क्रमांक पटकावत सर्वोत्कृष्ट वक्त्याचा बहुमान पटकाविला. जुन्नर येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे ३८ वे वर्ष होते. या स्पर्धेत सात गटांमध्ये एकूण ३८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.