

Domestic Dispute Escalates to Fatal Violence
Sakal
जुन्नर : घर व जमिनीच्या वादातून सख्या भावाच्या पत्नीची निघृणपणे हत्या केल्याची गंभीर व दुर्दैवी घटना जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निमगिरी येथे घडली. सदरची घटना सोमवार ता 5 रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी तुषार निंबा साबळे याच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अरुणा शरद साबळे वय 38 वर्षे यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची फिर्याद शरद निंबा साबळे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान या घटनेमुळे आदिवासी भागात एकच खळबळ उडाली आहे.