

Mother's Desperate Act: 14-Hour High-Altitude Protest for Son's Future
sakal
नारायणगाव : जातीचा दाखला मिळत नसल्याने मुलाचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. फी भरायला पैसे नसल्याने अभियांत्रिकी शिक्षणापासून मुलगा वंचित राहिला आहे. मुलाच्या भविष्याचे काय या विवंचनेत असलेल्या आर्वी - गुंजाळवाडी येथील आर्थिक दुर्बल घटकातील सविता बापू कांबळे(वय 35, सध्या राहणार आर्वी गावडे मळा, मूळ राहणार कर्नाटक) या महिलेने जातीचा दाखला मिळावा या मागणी साठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुमारे दीडशे फूट उंचीच्या बीएसएनएल च्या टॉवरवर चढून आंदोलन केले.