
पुण्यातील जुन्नर तालुक्यात कोकणकड्याच्या दरीत एका तलाठ्यासह कॉलेज तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. श्रीगोंद्यातील तलाठ्याचं नाव रामचंद्र पारधी असं आहे. त्यांचा मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळून आलाय. त्यांची कार दुर्गावाडी इथल्या कोकणकडा परिसरात आढळलीय. तर रामचंद्र यांच्यासह तरुणीच्या चपला तिथेच सापडल्या.