

जुन्नर, ता. १६ : निमगावतर्फे म्हाळुंगे (ता. जुन्नर) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पती नवनाथ बाजीराव पारखे (वय ४२) याला जुन्नर पोलिसांनी अटक केली. खुनानंतर पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या पतीचा बनाव पोलिसांनी सखोल चौकशीत उघड केला.
नवनाथ पारखे हा पत्नी रूपाली (वय ३५) हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. शनिवारी (ता. १६) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या वादातून नवनाथ याने रूपालीचा गळा दाबून खून केला. हा प्रकार लपवण्यासाठी त्याने मृतदेह गोठ्यात दोरीने लटकवून पत्नीने आत्महत्या केल्याची खबर पोलिस ठाण्यात दिली. मात्र, पोलिसांच्या उलटतपासणीत नवनाथची उत्तरे विसंगत आढळल्याने संशय बळावला. घटनास्थळाची पाहणी आणि सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जुन्नर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.