जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी चोरीला

जुन्नरच्या महसूल भवनातून 
जप्त केलेला जेसीबी चोरीला
Published on

जुन्नर, ता. १२ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी जप्त केलेला जेसीबी तहसीलदारांच्या निवासस्थानानजीकच्या महसूल भवनाच्या आवारातूनच चोरीला गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासकीय कारवाईतील मुद्देमाल थेट शासकीय आवारातूनच लंपास झाल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, तालुक्यातील हिरडी येथे १९ मे २०२६ रोजी अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या जेसीबीवर (क्रमांक: यूपी ३१ टी ४१२०) महसूल पथकाने जप्तीची कारवाई केली होती. हे वाहन तहसील कार्यालयालगतच्या महसूल भवनाच्या आवारात ठेवण्यात आले होते. याच आवारातून १७ ते १८ ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तो चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे, ही घटना घडून २० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तक्रार देण्यास इतका विलंब का झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या असुरक्षित ठिकाणी का ठेवण्यात आला? या प्रकरणात विभागातीलच अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत का? दोषींवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकारामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com