जुन्नरमध्ये पेट्रोल टँकरला मोठी गळती

जुन्नरमध्ये पेट्रोल टँकरला मोठी गळती
Published on

जुन्नर, ता. १९ : जुन्नर-नारायणगाव मार्गावरील कुरण येथे मंगळवारी सकाळी पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. टायर फुटल्याने टाकीला छिद्र पडल्याने ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वाहतूक वळवल्याने मोठा अनर्थ टळला.
नारायणगावहून जुन्नरकडे सकाळी दहाच्या सुमारास पेट्रोल टँकर जात असताना कुरण येथील गतिरोधकावर टँकरचा मागील टायर फुटला. या वेळी टायरवरील मडगार्ड उडून टाकीला धडकल्याने छिद्र पडले आणि पेट्रोल गळती सुरू झाली. इंधन ज्वलनशील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक तातडीने सावरगावमार्गे वळवली.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा सुजाता काजळे व मधुकर काजळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून तातडीने मदतकार्य राबवण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com