
ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील पोलीसांनी बिगरशेती जमिन क्षेत्राचा बनावट पोटखराबाचा सातबारा तयार करून, त्याचा वापर करून फसवणुक करणे, जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवुन धाकदडपशाही करणे,अतीक्रमण करणे याबाबत गुन्हा दाखल करुन तपासा अंती दोन व्यक्तीना अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.