

पुणे, ता. २४ ः जुन्नरमध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मदतीचा हात दिला आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत प्राधिकरणातर्फे घटनेनंतर सात दिवसांत १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. शेंडे यांनी सोमवारी (ता. २४) पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीची बैठक घेऊन नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला. या वेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे उपस्थित होत्या. या बैठकीत सादर केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेत मुलीच्या आई-वडिलांना ही मदत मंजूर केली. या उपक्रमांद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मनोधैर्य योजना अत्याचार झालेल्यांना कायदेशीर, तसेच मानसिक आधार देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मनोधैर्य योजना व इतर योजनांबाबत माहिती घेण्यासाठी पुणे जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.