
मंचर : बंद बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात. यासाठी २००५ मध्ये मंचर (ता. आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार (स्व.) किसनराव बाणखेले यांच्यासह ६७ बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी (ता.१७) खेड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस सय्यद यांनी सर्वांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.