

PNE26W45619
सोलापूर : श्री चौडेश्वरी माता मंदिरातील गर्भगृहातील फुलांची आकर्षक आरास.
PNE26W45615
सोलापूर : ज्योती उत्सव पाहण्यासाठी मंदिरात झालेली भक्तांची गर्दी.
PNE26W45618
सोलापूर : तीस किलो वजनाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ज्योतीत तूप ओतताना भक्त.
ज्योतिरूपलो विलगुतुन्ना वेलासिनावम्मा ज्योतीकांतिलो श्री चौडेश्वरी तल्ली...
पहाटे २ ते ९.३० पर्यंत दीड हजार भक्तांकडून देवीगीतांचा गजर; पारंपरिक साजात रंगला ज्योती उत्सव
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : काळोखात उजळलेल्या ज्योती, कंठातून उमटणारी तेलुगु देवीगीते आणि भक्तिभावाने न्हाऊन निघालेला हजारोंचा समुदाय... अशा मंगल वातावरणात श्री चौडेश्वरी मातेचा ज्योती उत्सव रंगला. डोक्यावर पवित्र ज्योत, गळ्यात मोगरा-झेंडूचे हार, हातात गजरे आणि पायात घुंगरू असा पारंपरिक साज लेवून दीड हजारांहून अधिक तोगटवीर समाजबांधव उत्सवात सहभागी झाले. माईक, साउंड किंवा बँडबाजाविना केवळ देवीगीतांनी रंगलेला हा सोलापुरातील अनोखा उत्सव ठरला.
पहाटे २ वाजता साखरपेठेतून सुरुवात
पहाटे दोन वाजता साखरपेठेतून ज्योती उत्सवाला सुरवात झाली. ब्रह्ममुहूर्तावर मानाच्या आठ फंडींचे मानकरी डोक्यावर ज्योती घेऊन देवीमातेला ओवाळण्यासाठी मार्गस्थ झाले. प्रत्येक फंडीच्या अग्रभागी दाक्षिणात्य ढोल व टाळ घेऊन सेवेकरी देवीगीते गाणाऱ्या भक्तांना साथ देत होते. प्रत्येक ओळीच्या शेवटी ठेक्यात तेलुगु भाषेत देवीमातेचा जयघोष केला जात होता.
------------------
चांदीच्या कलशातील गोडभाताचा प्रसाद
प्रत्येक फंडीतील चांदीच्या कलशातील गोडभाताचा नैवेद्य सर्व फंडी मंदिरात आल्यानंतर श्री चौडेश्वरी मातेला दाखविण्यात आला. आरतीनंतर हा नैवेद्य भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला.
------------------
नारळ फोडून तहान भागवली
दीड हजारांहून अधिक भक्त पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. देवीगीते म्हणताना घसा कोरडा पडल्यावर मिरवणूक मार्गावर ५०० हून अधिक नारळ फोडण्यात आले. नारळातील पाण्याने भक्तांनी तहान भागवली.
-----------------------
६.४६ वाजता डक्का फंडी बुर्ला महाविद्यालयासमोर
बुर्ला महाविद्यालयासमोर सकाळी ६.४६ वाजता डक्का फंडीचे आगमन झाले. त्यानंतर सोमवार पेठ गट्टी फंड, पेद्दी फंड, चिला फंड, नंगी फंड, चौडेश्वरी फंड, साखरपेठ गट्टी फंड आणि नलगेशी फंड यांसह सर्व फंडी कन्ना चौकाकडे रवाना झाल्या. सकाळी ८.३० वाजता सर्व फंडी कन्ना चौकात पोचल्या. ज्योती डोक्यावर घेऊन देवीगीते म्हणत नाचण्याचा भक्तांचा उत्साह यावेळी गगनाला भिडला.
-------------------
९ वाजता मंदिरात; ९.२८ वाजता विसर्जन
सकाळी ८.५० वाजता पहिल्या फंडीने मंदिराला प्रदक्षिणा घालून पूर्वेकडील दरवाजातून प्रवेश केला. नऊ वाजता सर्व फंडी मंदिरात दाखल झाल्या. आठही फंडीतील भक्तांनी ज्योती घेऊन फेर धरत देवीगीते म्हटली. सकाळी ९.२८ वाजता अध्यक्ष नागनाथ कोंतम यांच्या हस्ते आठ फंडींच्या एकूण ४८ मानाच्या ज्योतींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर भक्तांनी ज्योती फंडीच्या मूळ ठिकाणी नेल्या.
--------------------
कोट PNE26W45612
सर्व फंडींच्या मानकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने व आध्यात्मिक परंपरेला साजेसा ज्योती उत्सव साजरा केला. उपाध्यक्ष पुलप्पा चिंता, राजेंद्र चिला, सचिव अनिल कंदी, खजिनदार अरविंद भीमरथी, हिरालाल येरपुल यांनी समन्वय साधून उत्सव वेळेत पार पाडला. आज श्री चौडेश्वरी माता व बंधू वीरभद्र यांची भेट झाल्यानंतर श्री मल्लिकार्जुन देवांचे दर्शन घेण्याचा सोहळा होणार आहे.
- नागनाथ कोंतम, अध्यक्ष, श्री चौडेश्वरी वरप्रासादिक तोगटवीर क्षत्रिय समाज संस्था
------------------------------
कोट PNE26W45614
गेल्या पाच वर्षांपासून ज्योतींना गोंडे व उंडे बनवत आहे. यंदा जवळपास एक हजार ४५० उंडे व ३५० गोंडे बनवण्याचे भाग्य लाभले. सर्व उंडे व गोंडे लावूनच ज्योती सजवण्यात आल्या. या उत्सवातील सेवा सार्थकी लागली.
- ज्योती महालक्ष्मी उदगिरी, भक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.