भारतात सर्वप्रथम प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या, त्या बंगाल इलाख्यात. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला. त्यानंतर मिस मेरी अँन कुक यांनी 1822 मध्ये कोलकात्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या.
जोतिबा (Jyotiba Phule) अणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे. मात्र, ते दोघे नेमक्या कुठल्या शाळेत शिकले हे आजही निश्चित नाही. याबाबत संशोधकांमध्ये उत्सुकता असेलच.