
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होत असताना विरोधीपक्षाचे काही नेते, बैचेन झाले आहेत. त्यांना हा विकास बघवत जात नाही. काँग्रेसने त्यांच्या गरजेनुसार संविधानाचा वापर केला, नंतर त्याला कचरा पेटीत टाकून दिले. काँग्रेसच्या प्रेमाच्या (मोहब्बत की दुकान) दुकानात द्वेषाचे सामान भरलय, अशी टीका केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली.