पुणे-सोलापूर हायवेवर 'रोड रेज'चा थरार! कदमवाकवस्तीत कार चालकाला बेदम मारहाण; पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चक्र फिरवली
sakal
लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावर किरकोळ अपघातानंतर चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एसबीआय बँकेसमोर शुक्रवारी (१७ एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.