

खराडी ः ढोले पाटील कॉलेजच्या मैदानावर झालेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेच्या चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात जेतेपद पटकाविणाऱ्या कॅलम हायस्कूलच्या खेळाडू आनंद व्यक्त करताना.
---------------
कॅलम हायस्कूलने पटकाविला जेतेपदाचा मान
शालेय फुटबॉल स्पर्धा ः आरिया आणी रिवाची सरस कामगिरी
पुणे, ता. २१ ः आरिया सारडा आणी रिवा ललवानीने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर कॅलम हायस्कूलने शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित चौदा वर्षांखालील मुलींच्या गटाच्या शालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत कॅलम स्कूलने फादर ॲग्नेल्स विद्यांकुर स्कूलवर रंगतदार सामन्यात २-१ अशी मात केली होती.
खराडी येथील ढोले पाटील कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत कॅलम संघाच्या खेळाडूंनी जोरदार सुरुवात केली. खेळाच्या सहाव्याच मिनिटाला आरिया सारडाच्या पासवर रिवा ललवानीने गोल नोंदवून कॅलम संघाचे खाते उघडले. त्यानंतर विद्यांकुर स्कूलच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. खेळाच्या पंधराव्या मिनिटाला आराध्या जाधवच्या पासवर श्रेया भुजबळने गोल नोंदवून विद्यांकुर संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांत आघाडी मिळवण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. २४व्या मिनिटाला पुन्हा एकदा आरिया सारडाच्या पासवर रिवा ललवानीने आणखी एक गोल नोंदवला आणि कॅलम संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवून कॅलम संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या लढतीत रिवा ललवाणीच्या हॅट्ट्रिकच्या (४, ९, १२ मि.) आणि लेह जैनच्या (१७ मि.) एका गोलच्या जोरावर कॅलम स्कूलने सेंट जोसेफ स्कूलवर ४-० अशा गोलने मात केली होती,
बरिरा शेखच्या दोन (७, २५ मि.) गोलच्या जोरावर फादर ॲग्नेल्स स्कूलने सी. एम. इंटरनॅशनल स्कूलवर २-० असा विजय नोंदवला होता.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.