

वालचंदनगर, ता. २९ : कळंब (ता. इंदापूर) येथे फडतरे नॉलेज सिटीमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये घेतलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनामध्ये पुणे आणि सोलापूर जिल्हातील ९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ४७ विद्यार्थ्यांनी ३१ प्रकल्प सादर केले.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळवा तसेच त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती जागृती होण्यासाठी जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन घेण्यात आले. यामध्ये पुणे जिल्हातील दौंड, इंदापूर व बारामती तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्यातील ९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ४७ विद्यार्थ्य्यांनी नवनवीन प्रोजेक्ट सादर केले.
स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिगवण, कळंब, बोरीभडक, माळेगाव, काऱ्हाटी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गोविंद औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नातेपुते, खंडाळी, दहिगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडतरे नॉलेज सिटीचे सचिव दत्तात्रेय फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जय फडतरे, प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर, डॉ. सोनाली देशमुख, डॉ. विपुल निंबाळकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गणेश चव्हाण उपस्थित होते.
फडतरे म्हणाले, ‘‘देशामध्ये कुशल मनुष्यबळाची गरज आहे. मुलांनी कुशल होण्यासाठी प्रयत्न करावेत. एआयचा उपयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असून याचे प्रशिक्षण सुरु करण्याचा मानस आहे. बक्षीस वितरण इंदापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दिनेश पानसरे, गट निदेशक अनिल सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.
विजेत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था
प्रथम - बोरीभडक, दौंड (ऑटोमेटिक हेडलाईट सेन्सर सिस्टीम)
द्वितीय - कळंब, इंदापूर (घरगुती आर्क वेल्डिंग मशीन निर्मिती)
तृतीय - इंदापूर (हायड्रोपॉवर स्टेशन)
उत्तेजनार्थ - भिगवण, इंदापूर (ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.