कळस - कळस (ता. इंदापूर) येथील माळरानावर उभारलेल्या मुक्तसंचार गायींच्या गोठ्यातून वर्षाकाठी सरपंच सविता सुरेश खारतोडे लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. इंदापूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा त्यांच्याकडे आहे. दिवसभर सरणार नाही एवढे काम असूनही गावाच्या सेवेसाठी दिवसातील ठरावीक वेळ त्या राखीव ठेवतात.