

गराडे, ता. ३१ : विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ व सिंगापूर ग्रामस्थांच्या वतीने सिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ रविवारी (ता. ३०) नारायणपूर येथील पोपट महाराज टेंबेस्वामी, व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर, शिवसेना नेत्या ममता शिवतारे-लांडे यांच्या हस्ते कलश पूजन करून करण्यात आला.
सकाळी सात वाजता मंदिर प्रवेश त्यानंतर प्राणप्रतिष्ठा, मूर्तींना अभिषेक दुपारी दीड ते दोन कलशस्थापना होऊन सनराइज कंपनीचे राजेंद्र मोरे यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. दुपारी तीन ते चार होमहवन, सायंकाळी सात ते नऊ विठ्ठल आध्यात्मिक शिक्षण संस्था यांच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम होऊन कलशारोहण कार्यक्रमाची सांगता झाल्याची माहिती सरपंच अर्चना लवांडे, उपसरपंच विक्रांत पवार व सिंगापूर ग्रामस्थांनी दिली.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव सतिश उरसळ, जिल्हा परिषद सदस्या रुपाली झेंडे, ज्योती झेंडे, पंचायत समिती उपसभापती प्रवीण जगताप, सदस्या अर्चना कटके, सरपंच अर्चना लवांडे, उपसरपंच विक्रांत पवार, शिवसेना तालुका प्रमुख उमेश गायकवाड, दशरथ लवांडे, माउली कोरडे, अशोक लवांडे, रामभाऊ उरसळ, विशाल लवांडे, सौरभ लवांडे, संगीता वारे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.