

काळेवाडी, ता. २० : काळेवाडी येथील विजयनगर परिसरात वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः सायंकाळच्या वेळेत आणि रात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमध्ये वारंवार वीज जात असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना घरात राहणे कठीण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही भागांत दररोज वीजपुरवठा खंडित होत असून अनेक वेळा तास न तास वीज येत नाही. त्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून ऑनलाईन काम करणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेकदा तक्रार करूनही समस्या कायम असून संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. जुन्या विद्युत तारा, रोहित्रावरील वाढलेला ताण आणि देखभालीअभावी ही समस्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महावितरण आणि संबंधित प्रशासनाने काळेवाडी परिसरातील वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारी
- वारंवार वीजपुरवठा खंडित होणे
- कमी दाबाने वीजपुरवठा
- रात्रीच्यावेळी अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न
- पाणीपुरवठ्यावर परिणाम, मोटारी बंद पडणे
- विद्युत उपकरणे जळण्याची भीती
- महावितरणकडून वेळेवर माहिती न मिळणे
उन्हाळ्यात रात्री सतत वीज जात असल्याने घरात राहणे कठीण झाले आहे. महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
- संदीप दुसाने, स्थानिक रहिवासी
पिंपरी परिसरात काही अडचणी होत्या. पण आता नाहीत. तसेच काही तक्रारी असतील, तर त्यांचे निवारण केले जाईल.
- सुनील कदम, महावितरण, काळेवाडी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.