राशीन

राशीन
Published on

RAS26A02484
चिलवडी : कळी उमलताना या कार्यक्रमात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. जयश्री मुळे.

‘कळी उमलताना’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

राशीन : चिलवडी (ता. कर्जत) येथील नागेश्‍वर विद्यालयात पार्थ वेल्फेअर फाउंडेशनच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थिनीसाठी घेण्यात आलेल्या ‘कळी उमलताना’ या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘कळी उमलताना’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. जयश्री मुळे यांनी मुलींना वयात येताना होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांबाबत मार्गदर्शन करीत, आरोग्याची काळजी आणि वैयक्तिक स्वच्छता यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, मुख्याध्यापक मोहन कदम, संगीता सरकाळे, चांगुणा सटाले, रूपाली पाटील, पार्थ वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शांताराम पडळकर, सचिव ऋतुजा पडळकर उपस्थित होत्या. संग्राम पाटील यांनी डॉ. जयश्री मुळे व पार्थ वेल्फेअर फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक कदम यांनी केले. आभार उत्तम जगताप यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com