Kalubai Devi Navratri : काळुबाई देवीच्या नवरात्रोत्सवात कोळवडीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, रक्तदानातून समाजसेवाचा संदेश!

Kalubai Devi Navratri : पुणे जिल्ह्यातील राजगड (वेल्हे) तालुक्यातील कोळवडी येथे काळुबाई देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर, शिवव्याख्यान, कीर्तन, भजन आणि भारुडातून सामाजिक सेवा, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामस्थांच्या एकोप्याचा संदेश देण्यात आला.
Devotees and villagers gather in Kolwadi for the Kalubai Devi Navratri festival, featuring cultural programmes and a blood donation camp.

Devotees and villagers gather in Kolwadi for the Kalubai Devi Navratri festival, featuring cultural programmes and a blood donation camp.

esakal

Updated on: 

वेल्हे : ग्रामदैवतावरील श्रद्धा, गावकऱ्यांचा एकोपा आणि समाजसेवेची भावना यांचा सुंदर संगम राजगड (वेल्हे) तालुक्यातील कोळवडी गावात पाहायला मिळाला. गावाची ग्रामदेवता असलेल्या काळुबाई देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या काळात हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. रक्तदान शिबिर, शिवव्याख्यान, कीर्तन, भजन आणि भारुड यांसारख्या उपक्रमांमुळे उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com