Pune Porsche Accident : दोघांचा बळी गेल्यानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; कोरेगाव पार्कमधील पब केला जमीनदोस्त

कल्याणीनगर येथील अपघातामध्ये (Kalyani Nagar Accident) दोघांचा बळी गेल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाला (Pune Municipal Corporation) जाग आली आहे.
Pub in Koregaon Park
Pub in Koregaon Park esakal
Updated on
Summary

पालिकेने जेसीबी मशीन, जॉ कटर मशिनने ही कारवाई केली असून यावेळी वरिष्ठ अधिकारी व ऐंशी कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक व इतर वीस पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

घोरपडी : कल्याणीनगर येथील अपघातामध्ये (Kalyani Nagar Accident) दोघांचा बळी गेल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाला (Pune Municipal Corporation) जाग आली आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, घोरपडी, पुणे स्टेशन, विमाननगर येथील एकूण ५४,३०० हजार स्केअर फुटाचे बांधकाम आणि पत्राचे शेड हटविण्यात आले. यामध्ये मुंढावा भागातील नदी लगत असलेले वॉटर्स, ओरिला, अनविल्ड, सुपर क्लब या हॉटेलवर महापालिकेने कारवाई करताना पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.

यामध्ये हॉटेल ओरिला, हॉटेल अनविल्ड, हॉटेल सुपरक्लब हे जॉ कटरच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे. हे पुण्यातील नामांकित पब होते, अनेक वर्षांपासून सुरू होते. या पबमध्ये शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात तरुणाई थिरकत होती, रात्री उशिरा पर्यंत हे पब सुरू असतात. हे पब अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती होती. याआधी येथे कारवाई झाली होती, मात्र किरकोळ कारवाई करण्यात आली होती. मात्र, कल्याणी नगर अपघातानंतर आता पुणे महानगर पालिकेला जाग आली आहे. या पबवर थेट कारवाई करत ते पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.

Pub in Koregaon Park
Pune Porsche Accident: विशाल अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन कसं आहे? शिवसेना नेत्यावर केला होता गोळीबार...

पालिकेने जेसीबी मशीन, जॉ कटर मशिनने ही कारवाई केली असून यावेळी वरिष्ठ अधिकारी व ऐंशी कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक व इतर वीस पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे, उपअभियंता योगेश सोनवणे, कनिष्ठ अभियंता सुमित गायकवाड यांनी केली.

Pub in Koregaon Park
Pune Porsche Accident: ड्रायव्हर मुंबईत, अग्रवाल कोल्हापुरात...; कल्याणीनगर अपघात प्रकरणी असा दिला पोलिसांना गुंगारा

वॉटर पबमधील अनधिकृत बांधकाम तोडले

या कारवाई दरम्यान वॉटर पबमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. कार्यालय, स्टोर व कर्मचाऱ्यांच्या खोल्यावर पालिकेने कारवाई केली. परंतु, मुख्य इमारतीबाबतच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण व मंजूर नकाशा प्रमाणे असल्यामुळे तसेच सर्व कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात आलेले असल्यामुळे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com