Kalyani Nagar Accident : पैसेवालों के लिये कानून नही होता;अनीषच्या मामांना शोक अनावर,पोलिसांबद्दल संताप

‘हमारा बच्चा तो अब नही रहा। लेकिन जिसने उसको मारा है वो तो घर में आराम कर रहा है। कानूनने उसको निबंध लिखने को कहा है। पैसेवालों के लिये कानून नही होता है,’ अशी तीव्र प्रतिक्रिया अनीष अवधियाचे मामा ज्ञानेंद्र सोनी यांनी व्यक्त केली.
Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accidentsakal

‘हमारा बच्चा तो अब नही रहा। लेकिन जिसने उसको मारा है वो तो घर में आराम कर रहा है। कानूनने उसको निबंध लिखने को कहा है। पैसेवालों के लिये कानून नही होता है,’ अशी तीव्र प्रतिक्रिया अनीष अवधियाचे मामा ज्ञानेंद्र सोनी यांनी व्यक्त केली.

‘सकाळ’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांच्या आवाजातील कंप जाणवत होता. आपला तरुण उमदा भाचा अपघातात गमावल्याने त्यांना रडू कोसळत होते. हुंदके रोखण्याचा प्रयत्न करीत ते बोलत होते... ‘‘पुणे हे सुशिक्षितांचे तसेच सुरक्षित शहर असल्याचे म्हटले जाते. आमचे दोन्ही भाचे या शहरात राहात असल्याने आम्ही निर्धास्त होतो. पण श्रीमंत घरातील मुलाच्या भरधाव मोटारीच्या धडकेत त्याचा मृत्यू होतो... मग जे काही घडतेय ते संतापजनक आहे.’

सोनी यांना आता काळजी आहे ती अनीषच्या आई-बाबांची. अनीषने घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्याच्या अशा मृत्यूचा धक्का त्यांना कसा सहन होणार, ते कसे सावरणार ही चिंता त्यांना खात होती.

‘‘अनीषच्या वडिलांची प्रिंटिंग प्रेस आहे. व्हिजिटिंग कार्ड वगैरे छपाईची कामे ते करतात. त्याची आई गृहिणी आहे. पुण्यात उच्च शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या अनीषने घराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्याने लहान भावालाही पुण्यातील महाविद्यालयात दाखल केले होते. त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च तोच करीत होता. आता घरातील कमावता मुलगा गेला. त्याचे आई-बाबा हे दुखः कसे सहन करणार, त्यांना कोण सावरणार...’’ असे म्हणताना सोनी यांना अश्रू अनावर झाले होते.

Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accident : पबचा बाजार अन् जनता बेजार;मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा परिसरात सुमारे ७० पब

ससूनमधील संवेदनाशून्य प्रतिसाद

अनीषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह थोडा वेळ तरी शवागारात ठेवण्याची विनंती तेथील कर्मचाऱ्यांना करण्यात आली. ‘मात्र फक्त अर्धा तास ठेवतो, मृतदेहाचे विघटन झाल्यास जबाबदारी आमची नाही...’ असे ऐकविण्यात आल्याचे सोनी यांनी सांगितले. पुण्याचा असा वाईट अनुभव आल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com