
पुणे : ‘कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यपान करून पोर्शे कार भरधाव वेगाने चालवून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. त्याच्या आई-वडील व सहआरोपींनी कट रचून रक्ताचे नमुने बदलले. ही दोन्ही कृत्ये अतिशय घृणास्पद गुन्हे आहेत. त्याचे परिणाम अल्पवयीन मुलाला माहिती होते. त्यामुळे या मुलाला प्रौढ ठरवून त्याच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यात यावा,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सोमवारी बाल न्याय मंडळात केला.