
पुणे : कल्याणीनगर अपघातानंतर ससून रुग्णालयाप्रमाणेच औंध येथील जिल्हा रुग्णालयातही अल्पवयीन कारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सरकार पक्षाने केला. या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जबाब असलेली कागदपत्रे विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी मंगळवारी पुणे न्यायालयात सादर केली.