पृथ्वीराज सावंत यांच्याकडून कमल चव्हाण यांना पंचवीस हजार रुपयांची मदत
MDH26B05151
जामगाव (ता.माढा) ः घर आगीत जळून खाक झालेल्या कमल चव्हाण यांना मदतीचा धनादेश देताना जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत.
पृथ्वीराज सावंत यांच्याकडून कमल चव्हाण यांना २५ हजारांची मदत
माढा, ता. २५ : जामगाव (ता. माढा) येथील शेतकरी कमल तानाजी चव्हाण यांचे घर गॅसच्या स्फोटात जळून खाक झाल्याने जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी चव्हाण यांना तातडीची मदत म्हणून २५ हजारांचा धनादेश दिला. जामगाव येथील कमल चव्हाण या सकाळची घरची कामे उरकून शेतात गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घर व घरातील साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे कमल चव्हाण यांना राहण्यास घरही नव्हते, रोजीरोटीचाही प्रश्न आहे. जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी कमल चव्हाण यांचे सांत्वन करून तातडीची मदत म्हणून पंचवीस हजारांचा धनादेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

