कामती खुर्द ग्रामपंचायतचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात दुसरा क्रमांक

कामती खुर्द ग्रामपंचायतचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात दुसरा क्रमांक
Published on

KMT26B00934
मुंबई : येथे माझी वसुंधरा अभियानात पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कामती खुर्दच्या सरपंच सविता माळी, उपसरपंच दीपक काटकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी.

माझी वसुंधरा अभियानात स्पर्धेत
कामती ग्रामपंचायतीचा दुसरा क्रमांक
.........
कोरवली, ता. २२ : मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द ग्रामपंचायतीने शासनाच्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. मुंबई येथे राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्या गटामध्ये कामती खुर्द ग्रामपंचायतीचा समावेश होता. माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावात पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. पर्यावरणाला पोषक असे अनेक उपक्रम या अभियानात गावामध्ये घेतले गेले आहेत. याचीच दखल घेऊन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांनी दखल घेऊन व गावातील सर्व उपक्रम पाहून सर्व निकष तपासून पाहून हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सरपंच सविता माळी, उपसरपंच दीपक काटकर, ग्रामविकास अधिकारी मंजुश्री कारंडे, ग्रामपंचायत कर्मचारी महावीर रणदिवे, दीपक तरंगे, रवी माळी, तुकाराम क्षिरसागर आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी यांचे मार्गदर्शन, तसेच सुदर्शन तरुण मंडळाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com