पुणे - सरकारी रुग्णालय म्हटले की उपचारांची मर्यादा, अचूक निदानाचा अभाव अशी एक सामान्य धारणा असते. मात्र, पिंपरी चिंचवड येथील जांबे येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय संगीता (नाव बदललेले) हिला पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात योग्य व वेळेवर उपचार यामुळे केवळ आजारमुक्तीच नव्हे, तर जीवनाला नवीन दिशा मिळाल्याचा अनुभव आला. दरम्यान, संगीताला हे उपचार मिळण्यासाठी मात्र, मोठी कसरत करावी लागली.