

Kamla Nehru Hospital
Sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. पण कमी पगार असल्याने येथे डॉक्टर नोकरीसाठी येत नसल्याची तक्रार वारंवार केली जात होती. त्यामुळे या तज्ज्ञ डॉक्टरांचा सव्वा लाखावरून थेट अडीच लाख रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. २५ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यासाठी त्वरित मुलाखतीसाठी अर्ज मागवून घ्या असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.