Kanakagiri Sambhaji Maharaj Memorial : कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर उभारली ४०० किलोची मेघडंबरी; पुण्यातील शिवप्रेमींचा ‘गनिमी काव्या’ने यशस्वी उपक्रम

कणकगिरीतील थोरले संभाजी महाराजांच्या उपेक्षित स्मृतीस्थळावर शिवप्रेमींच्या सहा लाखांच्या योगदानातून ४०० किलो पंचधातूची मेघडंबरी, गनिमी काव्याच्या धर्तीवर रातोरात उभारणी
400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.

400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.

Sakal

Updated on

पुणे : स्वराज्यासाठी बलिदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्नाटकातील कणकगिरी येथील समाधीवर ४०० किलो वजनाची पंचधातूची मेघडंबरी उभारण्यात आली आहे. धर्मवीर शिवसेना आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. गौरव घोडे आणि श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी 'गनिमी काव्या'च्या धर्तीवर रातोरात कर्नाटक गाठून हा ऐतिहासिक उपक्रम पूर्ण केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com