

वाघ सुधारित
मांडला (मध्य प्रदेश), ता. २८ (पीटीआय) : वाघांच्या संख्येत भारत हा जगात प्रथम क्रमांकावर असून भारतातील संख्येमध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्प देशात अव्वल आहे. २०२२ च्या गणतीनुसार या अभयारण्यात ७८५ वाघांचा मुक्त वावर आहे. या व्याघ्रसमृद्ध राष्ट्रीय उद्यानातील वनकर्मचाऱ्यांमध्ये सध्या मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी जानेवारीपासून येथे २५ वाघांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १० वाघ याच महिन्यात मृत्युमुखी पडले आहेत. या दहामध्ये तीन बछडे आहेत. वाघांच्या मृत्युमुळे वनकर्मचारीच नव्हे, तर पर्यावरणप्रेमींमध्येही खळबळ उडाली आहे.
कान्हा व्याघ्र प्रकल्पातील सर्ही क्षेत्रात तीन दिवसांपूर्वी वाघाच्या एका बछड्याचा मृतदेह आढळला. त्याआधी २१ एप्रिल आणि २३ एप्रिललाही बछडे मृतावस्थेत आढळले होते. हे तिन्ही बछडे ‘टी-१४१’ या वाघिणीचे होते. शंकेचे निरसन करण्यासाठी नुकताच सापडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जबलपूर येथे पाठविण्यात आले होते. या बछड्याचा मृत्यू श्वसननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्याचे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रवींद्रमणी त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र, ही वाघीण अशक्त आहे. त्यामुळे तिच्या चौथ्या बछड्याबाबत वनकर्मचाऱ्यांना चिंता आहे. सर्व बछडे एक वर्षांचे आहेत. अशक्तपणामुळे वाघिणीला शिकार करता येत नसल्याने तिन्ही बछड्यांचा मृत्यू उपासमारीनेच झाला असावा, असा अंदाज काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या या वाघिणीवर देखरेख ठेवली जात असून तिला चांगला आहार मिळेल, अशी तजवीज केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.