पर्यटकांनो पर्यटनाबरोबर देशी वृक्ष लावा आणि जगवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tree

पर्यटकांनो पर्यटनाबरोबर देशी वृक्ष लावा आणि जगवा

उंड्री : कानिफनाथ गड आणि दिवेघाटावर दरवर्षी वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होते. मागिल काही वर्षांपासून पर्यटकांना वृक्ष लावा, जगवा असा संदेश दिला, त्याचे अनेकांकडून अनुकरण केले जात आहे. दरवर्षी देशी वृक्षांची लागवड करायची आणि ती सांभाळायची असा निश्चय पर्यटकांकडून केला जात आहे, ही समाधानाची बाब असल्याचे वर्षा पाटील यांनी स्पष्ट केले.

कानिफनाथ गड परिसर आणि लगतच्या गावातील पर्यटकांसह शहर-उपनगरातील पर्यटकांची शनिवार-रविवारी दिवेघाट आणि कानिफनाथ गड परिसरातील धबधबे पाहण्यासाठी अवघी तरुणाई गर्दी करीत आहे. हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेज सोसायटीसह परिसरातील डॉ. अनिल पाटील, वर्षा अनिल पाटील, विष्णू भाईजी, प्रकाश भाईजी, अमर भाईजी, विवेक सातपुते, सोनाली सातपुते, प्रिया धुमाळ, रामचंद्र भाईजी, अक्षय भाई असा मोठा ग्रुप कानिफनाथ डोंगरावर ट्रेकिंगसाठी दर रविवारी भल्या पहाटे जातो.

डॉ. अनिल पाटील म्हणाले की, श्रावणसरी सुरू झाल्यामुळे कानिफनाथ गडावर निसर्गप्रेमीसह पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. यावर्षी वरुणराजाची कृपा झाल्यामुळे डोंगर-पायथा हिरवाईने नटला आहे. पाणवठे पाण्याने खच्चून भरले आहेत. धबधबे वाहू लागले आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोर, ससा, वन्य जीवप्राण्यांबरोबर सरपटणारे साप, सरडे, कासवांचेही दर्शन पर्यटकांना होऊ लागले आहे. पर्यटकांनी मागिल दोन वर्षांपासून जोपासलेली झाडे बहरताना पाहून समाधान वाटत आहे, असे डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.

Web Title: Kanifnath Fort Tourists Plant Native Trees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..