पंकज देव यांना काण्वेद पुरस्कार तर रामसखा बडवे यांना ब्रम्हभुषण पुरस्कार घोषित
पंकज देव, रामसखा बडवे यांना पुरस्कार
.......
पंढरपूर : शहरातील काण्ववेद पाठशाळेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा काण्ववेद पुरस्कार वाशीम येथील वेदमूर्ती पंकज देव यांना तर ब्रम्हभूषण पुरस्कार पंढरपूरचे वेदमूर्ती रामसखा बडवे यांना घोषित झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण मंगळवारी (ता. ३) हरिदास वेस, त्र्यंबकेश्वर मंदिरात करण्यात येणार आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे गेल्या २९ वर्षांपासून वेदविद्या प्रसार, प्रचार, सवंर्धन व अध्यापनाचे महत्त्वपूर्ण कार्य काण्ववेद पाठशाळेच्या वतीने करण्यात येते. आतापर्यंत शेकडो विद्यार्थी या पाठशाळेतून शिकून बाहेर पडले आहेत. समाजात वेदविद्या प्रसार, अध्यापनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षी काण्ववेद पुरस्कार तर ब्राम्हण समाजासाठी भूषणावह कार्य करणाऱ्या व्यक्तीस ब्रम्हभूषण पुरस्कार देण्यात येतो. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रसाद महाराज बडवे, बाबासाहेब बडवे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, मदन हरिदास, अरविंद बेणारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

