कपिलदेव उलगडणार जीवनप्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil Dev
कपिलदेव उलगडणार जीवनप्रवास

कपिलदेव उलगडणार जीवनप्रवास

पुणे - भारताने १९८३ मध्ये प्रथमच क्रिकेट विश्वकप (Cricket Worldcup) जिंकला. या विश्वकपच्या दुर्मीळ आठवणी, संघटन कौशल्य आणि स्वत:चा अनुभव असा संपूर्ण जीवनप्रवास (Life Journey) माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कपिलदेव (Kapil Dev) उलगडणार आहे. महिलांना (Women) उद्योग-व्यवसायात (Business) प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फिक्कीच्या (Ficci) महिला संघटनेच्या (Women Organization) वतीने शनिवारी (ता. १६) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

फिक्की, पुणे ही उद्योजकांची शिखर संघटना आहे. ‘फिक्की फ्लो’ ही महिला आघाडी असून, या संघटनेच्या अध्यक्षपदी उद्योजिका नीलम सेवलेकर यांची नुकतीच निवड झाली आहे. महिला उद्योजिका घडविण्यासाठी वर्षभरात विविध उपक्रम, उद्योग मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महिला उद्योजकांना नवी उमेद आणि प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेस ‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षा सेवलेकर यांच्यासह वरिष्ठ उपाध्यक्षा रेखा मगर, उपाध्यक्षा पिंकी राजपाल, खजिनदार सोनिया राव, सहखजिनदार पुनम कोचर, सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनिस, उषा पूनावाला आदी उपस्थित होते.

लवळे गावाचा कायापालट करणार

लवळे गावाला महाराष्ट्रातील आदर्श गाव निर्माण करण्याचा संकल्प ‘फिक्की फ्लो’च्या महिला उद्योजकांनी केला आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा प्रमुख उद्देश आहे. महिला बचत गटांमार्फत रोजगार, आरोग्य सेवा, मुलांसाठी गुरुकुल, स्वच्छतागृहे, कचरा प्रकल्प अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी महिला आणि युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ २२ एप्रिल रोजी लवळे येथे होणार असल्याचे सेवलेकर यांनी सांगितले.

Web Title: Kapil Dev Life Journey Pune Ficci Women Organization

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top