कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण

कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण
Published on

नसरापूर/परिंचे, ता. ३ : कापुरव्होळ येथील आनंद उद्योग समुहाचे लखनशेठ दळवी यांच्या १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून मोटारीने पळून जाणाऱ्या अपहरणकर्त्यांचा पोलिस यंत्रणा व ग्रामसुरक्षा यंत्रणा यांनी सिनेस्टाईल नाकाबंदी करून अवघ्या काही तासांत मुलाला हस्तगत केले; मात्र यावेळी अपहरणात वापरलेली मोटार सोडून अपहरणकर्त्यांनी पलायन केले त्यांचा तपास राजगड पोलिस व जिल्हा गुन्हेशाखा करत आहेत.
उद्योजक लखनशेठ दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी (वय १८) हा मंगळवारी (ता. ३) दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या कापुरव्होळ येथील हाँटेलवरून त्यांच्या दिवळे गावाजवळील बंगल्यावर जेवण्यासाठी निघाला होता. अचानक एक काळ्या रंगाच्या मोटारीमध्ये आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी त्यास जबरदस्तीने गाडीत मोटारीत बसवून पळवले. मोटार कापुरव्होळ येथुन सातारा दिशेने गेली यावेळी त्याचे वडील दळवी यांनी आरडाओरड करून मोटारीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु मोटार वेगात निघून गेली यावर वडिलांनी शिरवळ येथील पोलिस ठाण्यात संपर्क करत माहिती दिली तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या (१८००२७०३६००) या क्रमांकावर संदेश वितरित केला यामुळे पुण्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे व ग्रामविकास यंत्रणा यांना माहिती मिळून पोलिस व ग्रामस्थांकडून नाकेबंदी सुरू झाली.
कापुरव्होळ येथून निघालेली अपहरणकर्त्यांची मोटार सारोळा-वीर-मांडकी (ता. पुरंदर) येथून मुलाला घेऊन जात असताना जेजुरी पोलिस व ग्रामसुरक्षा दलाच्या ग्रामस्थांनी मांडकी येथे केलेली नाकाबंदी पाहून मोटार अलीकडेच थांबवण्याचा प्रयत्न केला असता मोटार रस्त्याच्याकडेला जाऊन उसाच्या शेतात गेली हे पाहताच अपहरणकर्त्यांनी मोटारीसह अपहरण केलेल्या पृथ्वीराज दळवी यास तिथेच सोडून पलायन केले. पोलिसांनी (एमएच १२ एक्स ई ५३५३) काळ्या रंगाची एक्सयुव्ही मोटार ताब्यात घेतली आहे. राजगड पोलिसांसह कुटुंबीयाने तातडीने मांडकी येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलाचे वडील लखनशेठ दळवी यांनी अपहरणकर्त्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जिल्हा गुन्हेशाखा व राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.


संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक १८००२७०३६०० व ९८२२११२२८१ यावर फोन करून माहिती दिल्यास हा आवाज परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांना फोनद्वारे ऐकवला जातो त्यामुळे सर्वजण सतर्क होऊन मदतीसाठी तत्पर होतात व गुन्ह्याला आळा घालणे शक्य होते या गुन्ह्यात देखील या यंत्रणेद्वारे संदेश सर्वत्र गेल्याने पोलिसांना ग्रामस्थांची मदत झाली.
- गणेश लोकरे, वरिष्ठ विभागीय अधिकारी, नियंत्रण कक्ष, ग्रामसुरक्षा यंत्रणा


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com